|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संजीवनी’चे मुख्य केमिस्ट, अकाऊटंट निलंबित

संजीवनी’चे मुख्य केमिस्ट, अकाऊटंट निलंबित 

प्रतिनिधी /धारबांदोडा :

धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यातील साखर विक्री व्यवहारात रु. 1 कोटींच्या कथीत गैरव्यवहार प्रकरणी कारखान्याचे मुख्य केमिस्ट नवीनकुमार वर्मा तसेच मुख्य अकाऊटंट साक्षी शेटगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कारखान्याच्या कामगारांनी केली आहे. 

 या अधिकाऱयांना निलंबित करावे, अशी मागणी करत संजीवनीच्या कामगारांनी काल गुरुवारी दिवसभर कारखान्यामध्ये ठाण मांडले होते. संजीवनी साखर कारखान्यातील गेल्या वर्षीच्या साखर विक्री निविदा प्रक्रियेत साधारणपणे एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

 संभाषणाच्या रिकॉर्डिंगमुळे घोटाळा उघड

 कंत्राटदाराच्या फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग कामगारांच्या हाती लागल्यानंतर हा घोटाळय़ाचा प्रकार उघडकीस आला आहे. कामगारांनी या गैरव्यवहार प्रकरणी आवाज उठवल्यानंतर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी दामोदर मोरजकर यांनी या प्रकरणी चौकशी करुन दोषिंवर कारवाई करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

 नवीनकुमार, शेटगावकर निलंबित

फोनवरील संभाषणातून कारखान्याचे दोन ते तीन अधिकारी गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये नवीन वर्मा यांचे नाव उघड झाल्याने प्रथम त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मुख्य अकाऊटंट साक्षी शेटगावकर व तिसऱया अधिकाऱयावरही कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी लाऊन धरली. त्यानंतर सायंकाळी उशिरा मुख्य अकाऊटंट साक्षी शेटगावकर यांना निलंबित करण्यात आले.