|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काळम्मावाडीचा आधार, दूधगंगा दुथडी

काळम्मावाडीचा आधार, दूधगंगा दुथडी 

वार्ताहर /कारदगा :

चालू वर्षी एकही वळीव पाऊस न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या या कडाक्याच्या उन्हामुळे कूपनलिका, विहिरींची पाणी पाण्याची पातळी कमी होत आहे. तर बऱयाच भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र याला दूधगंगा नदीकाठ परिसर अपवाद ठरला आहे. कारण काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदीला नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. पाणी मुबलक असले तरी असलेले पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.

चालूवर्षी सर्वत्र दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दूधगंगा नदीकाठ परिसर वगळता इतर भागात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे त्य भागातील लोकांना पाण्याचे महत्त्व उमजले आहे. मात्र दूधगंगा नदीकाठावरील नागरिकांना मुबलक पाणी मिळत असल्याने पाण्याची किमत न समजल्याने पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. परिणामी दुधगंगा नदीकाठावरील नागरिक व शेतकरी वर्गाने आतापासूनच पाण्याची बचत करण्याची गरज आहे.  तरच येणाऱया काळात पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही.