|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » पंत भक्त मंडळातर्फे आरती अवधूता सोहळा

पंत भक्त मंडळातर्फे आरती अवधूता सोहळा 

बेळगाव /प्रतिनिधी :

पंत भक्त मंडळ, बेळगाव व यमुनाक्का भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात आरती अवधूता शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळा पार पडला. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांची अत्यंत लोकप्रिय झालेली आरती या आरतीच्या रचनेला 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळी पंत महाराजांच्या प्रतिमा मिरवणुकीला गोवावेस दत्तमंदिर येथून सुरुवात केली. सोमवार पेठ, कवळे मठ मार्गे रामनाथ मंगल कार्यालयात सांगता करण्यात आली. त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडले. पंत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालकांनी श्रीपंत बालोपासना सादर केली. त्यानंतर प. पू. सुधीर पंतबाळेकुंद्री, डॉ. सुरेश कुलकर्णी, आशाताई पंतबाळेकुंद्री, लताताई जमखंडीकर यांनी श्रीपंत बोधपर मार्गदर्शन केले.

प. पू. अभिजीत पंतबाळेकुंद्री, प. पू. आप्पासाहेब दड्डीकर, ज्ञानदेव पुंगावकर, सुहास सातोस्कर, अवधूत वारंगे, डॉ. म. बा. जोशी यांनीही बोधसत्रामध्ये सहभाग घेतला. यावेळी प. पू. दादासाहेब पंतबाळेकुंद्री, प्रदीप पंतबाळेकुंद्री, रंजन पंतबाळेकुंद्री, संजीव पंतबाळेकुंद्री, डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, राजन पंतबाळेकुंद्री, अभिजीत पंतबाळेकुंद्री, नारायण किल्लेकर, रमेश कालकुंदी आदी उपस्थित होते.