|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सोनवडी गजवडी विद्यालयात अभयसिंहराजेंना अभिवादन

सोनवडी गजवडी विद्यालयात अभयसिंहराजेंना अभिवादन 

वार्ताहर /परळी :

विकासरत्न श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) यांची 75  वी जयंती सोनवडी गजवडी विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम भाऊसाहेब महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य अरविंद जाधव, संस्थेचे सचिव लक्ष्मण झणझणे, संस्थेचे खजिनदार माधवराव कदम, गजवडीचे उपसरपंच  धनाजी कदम, संचालक युसुब पटेल, शिवाजीराव कदम, विद्यालायाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. भाऊसाहेब महाराजांच्या कार्याची माहीती अरविंद जाधव, सचिव झणझणे सर, धनाजी कदम, पांडुरंग सुतार, झानेश्वर जांभळे यांनी दिली. भाऊसाहेब महाराजांनी विशेषतः डोंगर खोऱयामध्ये केलेले कार्य कधीही विसरता येणार नसून तोच वारसा पुढे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले चालवत आहेत. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या कार्यालाही सर्वांनी शुभेच्छा दिल्या.