|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रत्येक प्रभागामध्ये पावसाळी पूर्व काम सुरु

प्रत्येक प्रभागामध्ये पावसाळी पूर्व काम सुरु 

प्रतिनिधी /पणजी :

 पणजीतील पावसाळी पूर्व कामाची तयारी सुरु असून प्रत्येक प्रभागामध्ये कामगार घातले आहे. पुढील आठवडय़ा पर्यंत पणजीतील सर्व प्रभागातील कामे पूर्ण केली जाणार आहे, असे यावेळी पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

 पणजीतील पूरस्थिती येणाऱया सर्व जाग्यांची पाहणी केली आहे ती जागा दुरूस्त करण्याची कामे सुरु आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे आहे ते बुजविले जात आहे. तसेच इतर सर्व पावसाळी पूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे, असे यावेळी महापौरांनी सांगितले.

 मनपा आयुक्तांनी 15 मे नंतर कचरा गोळा केला जाणार नाही असा आदेश दिला असला तरी पणजीतील सर्व प्रभागातील ईमारतींचा कचरा गोळा केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरु नये. लवकरच नगरसेवकांची बैठक घेऊन यावर योग्य निर्णय घेणार आहे. खासगी ट्रक घालून कचरा गोळा करणार आहे. पणजीतील लोकांना कुठलीच कचऱयाची समस्या सतावणार नाही याची मनपा काळजी घेणार, आहे असे महापौर उदय मडकईकर म्हणले.

 पणजीतील कचरा समस्या ही खूप मोठी आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून हजारो कोटी रुपये खर्च केले आहे तरी बायंगिणी कचरा प्रकल्पा बांधण्यात आला नाही. बायंगिणी कचरा प्रकल्प होण्यासाठी आम्ही वेळ पडल्यास रस्त्यावर उतरायला तयार आहे. कारण पणजीत कचरा समस्या दिवसेदिवस वाढत आहे, त्यामुळे पणजीत कचरा समस्या वेळेवर सुटणे गरजेचे आहे, असे यावेळी महापौर म्हणाले.