|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणात बुलबुल पक्ष्याच्या पिल्लाला जीवदान

मालवणात बुलबुल पक्ष्याच्या पिल्लाला जीवदान 

वार्ताहर / मालवण:

 मेढा येथील उदय रोगे यांच्या शिवमुद्रा संग्रहालयाच्या बाजूला असणाऱया पाण्याच्या टाकीत बुलबुल पक्षाचे पिल्लू पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. संग्राहक उदय रोगे यांनी तात्काळ बुलबुल पक्ष्याच्या पिल्लास पाण्यातून बाहेर काढले व जीवदान दिले.

  उदय रोगे यांच्या संग्रहालयात काही महिन्यापूर्वी बुलबुल पक्षाने एक छोटेसे घरटे बांधले आहे. या घरटय़ात दोन बुलबुल पक्षी आपल्या तीन पिल्लांसह राहतात. शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या घरटय़ातील एक पिल्लू बाजूला असणाऱया पाण्याच्या टाकीत पडले. त्यामुळे बुलबुल पक्षी ओरडू लागले. बुलबुल पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रोगे हे धावत आले. बुलबुल पक्षाचे पिल्लू पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर रोगे यांनी भिजलेल्या त्या पिल्लाला कपडय़ाने पुसून बुलबुल पक्ष्याच्या घरटय़ात सोडले.