|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींपेक्षा अमिताभ बच्चनना निवडून द्यायला हवे होते !

मोदींपेक्षा अमिताभ बच्चनना निवडून द्यायला हवे होते ! 

प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर खोचक टीका

वृत्तसंस्था/ मिर्जापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक किर्तीचे अभिनेते आहेत. त्यांच्यापेक्षा बीग बी अमिताभ बच्चन यांनाच लोकांनी निवडून द्यायला हवे होते. अमिताभ पंतप्रधान झाले असते तरीही मोदींप्रमाणे त्यांनीही काही केले नसते, अशी खोचक टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. मिर्जापूर येथे काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारसभा आणि रॅलीदरम्यान त्या बोलत होत्या.

प्रियांका म्हणाल्या, सत्ताप्राप्ती एवढाच भाजपचा हेतू आहे. गत निवडणुकीतील आश्वासने त्यांनी पाळलीच नाहीत. या कालावधीमध्ये 5 कोटी रोजगार कमी झाले आहेत. काँग्रेसने मात्र नेहमीच शेतकऱयांची बाजू घेतली आहे. काँग्रेसने सामान्य जनांच्या हितासाठी काम केले आहे. भविष्यात काँग्रेसची सत्ता आली तरच सामान्य गरीब युवकांचे भवितव्य उज्ज्वल बनेल, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

शेतकऱयांच्या प्रश्नावर बोलण्याची मोदी यांची हिम्मत नाही, असा आरोप करून प्रियंका म्हणाल्या, मोदी नेते नाहीत तर अभिनेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी 15 लाख देण्याचे आश्वासन दिले पण नंतर मात्र या विषयाची ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगून ते टाळत राहिले आहेत, असेही त्या म्हणाल्या.  उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यात 19 रोजी 13 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यातील प्रचारात प्रियंका यांनी सहभाग नोंदवला.