|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ईमारतीवर कोसळले लढाऊ ‘एफ-16’ विमान

ईमारतीवर कोसळले लढाऊ ‘एफ-16’ विमान 

कॅलिफोर्निया

: अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एफ-16 हे लढाऊ विमान ईमारतीवर कोसळल्याने खळबळ निर्माण झाली. या दुर्घटनेत वैमानिक सुरक्षित असून दुर्घटनास्थळी लोक नसल्याने मोठा अनर्थ टळला. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

दक्षिण कॅलिफोर्नियातील हवाई दलाच्या तळाजवळील एका ईमारतीतील गोदामावर एफ-16 हे लढाऊ विमान कोसळले. प्रशिक्षणासाठी हे विमान झेपावले होते. वैमानिक विमान कोसळण्यापूर्वी पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. विमान ज्या गोदामावर कोसळले त्या गोदामातही दुर्घटनेच्या वेळी कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी आग लागली. मात्र, त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले.