|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला आता कायद्याचे बळ

तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला आता कायद्याचे बळ 

संसदेकडून विधेयक संमत : समलैंगिक विवाहासंबंधी कायदा करणारा तैवान आशियातील पहिला देश

वृत्तसंस्था/  तैपेई

तैवानच्या संसदेने शुक्रवारी समलैंगिक विवाहांना मान्यता देणाऱया कायद्याला मंजुरी दिली. सभागृहात झालेल्या मतदानानंतर समलैंगिक विवाहासंबंधी कायदा करणारा तैवान आशियातील पहिला देश बनला आहे. दोन वर्षांपूर्वी तैवानच्या घटनात्मक न्यायालयाने समलैंगिक जोडप्यांना कायद्याने विवाह करण्याचा अधिकार असल्याचा निवाडा जाहीर केला होता. त्यानंतर त्यासंबंधी संसदेने कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला होता. त्या अनुषंगाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

तैवानमधील घटनात्मक न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर समलैंगिक जोडप्यांना कायद्याने लग्न करण्याचा अधिकार देणारी अनेक विधेयके संसदेत सादर झाली होती. या विधेयकांपैकी सरकारने सदार केलेले सर्वात उदारमतवादी विधेयक संसदेत संमत झाले. समलैंगिक विवाहासंबंधी कायदा करण्यासाठी न्यायालयाने संसदेला 2 वर्षांचा अवधी दिला होता. सदर मुदत 24 मे रोजी संपणार होती. पण, तत्पूर्वीच कायद्याला संमती मिळाल्यामुळे समलैंगिक विवाहेच्छुकांनी आनंद व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा होण्याच्या प्रतिक्षेत असलेले अनेक समलैंगिक व्यक्ती, त्यांचे समर्थक, मानवी हक्क कार्यकर्ते राजधानी तैपेईमध्ये गोळा झाले होते. यावेळी मोठा जल्लोषही करण्यात आला. हजारो लोक या कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त करतानाचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते.

राष्ट्राध्यक्षही सकारात्मक

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई-इंग-वेन यांनी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर केल्यानंतर याची अंमलबजावणी होईल. राष्ट्राध्यक्षही याबाबत सकारात्मक असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. ‘आज आपल्याकडे इतिहास घडवायची संधी आहे. आपण हे जगाला दाखवून देऊ शकतो की उदारमतवादी मूल्ये पूर्व आशियायी देशातही रुजू शकतात’ असे ट्वीट करत शुक्रवारी साई इंग-वेन यांनी या विधेयकाला अंतिम स्वरुप मिळण्याचे संकेत दिले होते. आता पुढील प्रक्रियाही लवकर पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

समलैंगिकांच्या मागणीला अखेर मिळाले यश…

2017 मध्ये तैवानच्या घटनात्मक न्यायालयाने समलैंगिक जोडप्यांना कायद्याने लग्न करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. या निर्णयानंतर तैवानामध्ये असंतोषाची लाट उठली. लोकांना समलैंगिक लग्नांना परवानगी देणे मान्य नव्हते. त्यामुळे सरकारने दबावाखाली येऊन अनेक सार्वमते घेतली. त्यानंतर तैवान सरकारने सध्याच्या कायद्यात असणारी लग्नाची व्याख्या न बदलता एक वेगळा कायदा करून समलैंगिकांना लग्न करण्यास अनुमती देणारे विधेयक तयार केले. त्याच विधेयकाला आता संसदेची मंजुरी मिळाली आहे.

युवकाने अत्याचार केल्याचा युवतीचा आरोप

गेले वर्षभर लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया युवकाने लग्न करण्यास नकार दिल्याने युवतीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत पीडित युवतीने त्याचे आई-वडील आणि मित्रांनाही आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. संशयित युवकाने दोन वर्षापूर्वी युवतीला अंगठी देत लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र आता सदर युवक आपल्यासोबत आता विवाह करण्याबाबत सकारात्मक नसल्याचे लक्षात येताच युवतीने तिच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.