|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘एक्झिट पोल’ अगोदर शेअर बाजारात उत्साह

‘एक्झिट पोल’ अगोदर शेअर बाजारात उत्साह 

मुंबई

मुंबई शेअर बाजारात मागील दहा ते बारा सत्रांच्या प्रवासात तेजी ऐवजी घसरणीची नोंद अधिक झाली आहे. मात्र सप्ताहातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी मात्र बीएसई सेन्सेक्सने 537 अंकानी मजबूत कामगिरीची नोंद करत, 37,930.77 वर बंद झाला. तर निफ्टी 11,400 च्या टप्पा गाठण्यात यशस्वी झाला. रविवारी होणारे अंतिम टप्प्यातील मतदान आणि त्या दिवशी जाहीर होणाऱया एक्झिट पोल अंदाज यामुळे शेअर बाजारात मोठा उत्साह राहिल्याचे नोंदवण्यात आले. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या वातारणामुळे भारतासह अन्य देशांतील शेअर बाजारासह आर्थिक व्यवहार दबावात झाले परंतु शेवटच्या सत्रातील तेजी ही एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीचा उत्साह दाखविणारी असल्याची मते तज्ञांनी नोंदवली आहेत.