|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेटे, सोनवणे, सावळकर, गोटे, गोगटे, देवधर विजेते

शेटे, सोनवणे, सावळकर, गोटे, गोगटे, देवधर विजेते 

प्रतिनिधी/ सांगली

नूतन बुध्दिबळ मंडळाच्या 52 व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील कै. श्रीमंत बाळासाहेब लागू रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा सम्मेद शेटे याने प्रथम स्थान पटकावले. त्याला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर 10 वर्षाखालील गटात संकल्प सोनवणे, 14 वर्षे गटात आदित्य सावळकर, 16 वर्षे गटात कौस्तुभ गोटे, ज्येष्ठ खेळाडूमध्ये शिरीष गोगटे, 15 वर्षे गटात मुदीत देवधर यांनी प्रथम स्थान पटकावले.

    बापट बाल येथे या स्पर्धेचा शुक्रवारी सकाळी प्रारंभ झाला. उद्घाटन उद्योजक जीवन म्हैसकर व वृंदा म्हैसकर यांनी केले. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर,पुणे, मुंबई, लातूर, परभणी, पणजी  आदी जिह्यातील 60 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. यामध्ये  पुण्याचा किरण पंडितराव, सारंग पोंक्षे, सोहन फडके,  कोल्हापूरचा सम्मेद शेटे, अनिश गांधी, श्रीराज भोसले, प्रणव व सारंग पाटील, आदित्य सावळकर, उत्कर्ष लोमटे,ठाणेचा गोपाळ राठोड,मिरजेचा मुदस्सर पटेल,अभिषेक पाटील, सांगलीचा आदित्य टिळक, गायत्री रजपूत यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते.

    सातव्या फेरीत कोल्हापूरचा सम्मेद शेटे व पुण्याचा सोहन फडके यांच्यातील डावात दोघांनी डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह 6.5 गुण मिळवून सम्मेदने रू. 6000 च्या रोख पारितोषिकासह विजेतेपद पटकाविले तर सोहनला 5.5 गुणासह रू. 3000 च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूरच्या अनिष गांधीने ठाण्याचा गोपाळ राठोडचा पराभव करून 6 गुणासह रू. 4000 च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. इचलकरंजीच्या रविंद्र निकमने रेंदाळच्या श्रीराज भोसलेचा पराभव करून 5.5 गुणासह पाचवे स्थान पटकाविले.

  कोल्हापूरच्या उत्कर्ष लोमटेने पुण्याच्या सारंग पोंक्षेचा पराभव केला, तर उत्तरप्रदेशच्या नारायण यादव व कर्नाटकच्या राव जे मल्लेश्वरचा पराभव करून 5 गुणासह आठवे स्थान पटकाविले. पुण्याचा किरण पंडितरावने सांगलीच्या रोहित मोकाशीचा पराभव करून अकरावे स्थान पटकाविले. मिरजेच्या मुदस्सर पटेलने इचलकरंजीच्या कौस्तुभ गोटेचा पराभव करून 5 गुणासह सातवे स्थान पटकाविले. तर पुण्याच्या समीर इनामदार कोल्हापूरचा प्रणव पाटीलचा पराभव करून 5 गुणासह दहावे स्थान पटकाविले.

  तर 10 वर्षाखालील गटत संकल्प सोनवणे प्रथम व अथर्व तावरे द्वितीय, 14 वर्षाखालील गटात आदित्य सावळकर प्रथम व सारंग पाटील द्वितीय, 16 वर्षाखालील गटात कौस्तुभ गोटे प्रथम व सोहम चाळके द्वितीय, ज्येष्ठ खेळाडूंमध्ये शिरीष  गोगटे, तर 15 वर्षाखालील गटात मुदीत देवधर प्रथम स्थानावर राहिले. तसेच उत्कृष्ट महिला खेळाडूचा किताब श्रध्दा कदम यांनी व मुग्धाली निकम यांनी पटकावला. उत्कृष्ट महिला सांगली खेळाडूचा किताब स्नेहा निकम यांनी पटकावला.

पारितोषिक वितरण समारंभ कुमार लागू व रमा लागू यांच्याहस्ते व चिंतामणी लिमये, डा. उल्हास माळी, स्मिता केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला