|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » 20 वर्षापुर्वीच्या रिक्षा, टॅक्सी स्क्रॅप करण्याचे काम सुरू

20 वर्षापुर्वीच्या रिक्षा, टॅक्सी स्क्रॅप करण्याचे काम सुरू 

250 रिक्षा स्पॅप करण्यात आल्या-संजय धायगुडे

प्रतिनिधी/ सातारा

20 वर्ष झालेल्या जुन्या रिक्षा व ट्रक्सी स्पॅप करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार जुनी वाहने स्पॅप करून नवीन वाहने रस्त्यावर धावाव्यात. या धोरणानुसार वाहनधारकांनी आपल्या जुन्या वाहनांची माहीती न दिल्यास व तपासणीत आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून वाहने जप्त करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.

 दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून जुन्या वाहनात नवीन वाहनाची भर पडत आहे. या जुन्या गाडय़ा कमी करून त्याजागी नवीन गाडय़ा रस्त्यावर धावाव्यात म्हणून 8 जानेवारी 2019 रोजी जिल्हा राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीत राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार 16 वर्षाच्या वरील रिक्षा आणि 20 वर्षावरील ट्रक्सी स्क्रॅप करण्यात याव्यात, असा ठराव दिला गेला आहे. त्या अंनुशगाने 16 वर्षावरील रिक्षा स्क्रॅप करण्याची काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या चार-पाच महिन्यात 250 रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. आता प्रस्तावात नवीन रिक्षा येणार आहेत. तसेच या वाहनांची तपासणी केल्यानंतर ज्या रिक्षा 16 वर्षावरच्या असून त्या आरटीओ कार्यालयात आणून स्क्रॅप केल्या नाहीत, अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे धायगुडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.