|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. दि. 19 ते 25 मे 2019

मेष

रवि, बुध युती, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. डावपेच यशस्वी करणे सोपे नाही. तरीही जिद्दीने सर्वांना एकत्र करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेससाठी झगडून पुढे जाता येईल. घरातील समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांना मार्ग शोधता येईल.


वृषभ

रवि, बुध युती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या धंद्यातील अडचणी कमी होतील. मोठे काम ओळखीतून मिळवा. मैत्रीचा फायदा होईल असे नाही. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. जवळचे नेते, सरकारी कट करतील. मंगळवार, बुधवारी अडचणी येतील. खर्च वाढेल. डोक्मयाची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी घरात खोटेपणाने वागू नये. स्वत:चेच नुकसान होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


मिथुन

चंद्र, शुक्र त्रिकोण योग, मंगळ हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे धाडस करणे धोकादायक ठरू शकते. सप्ताहात अडचणी वाढतील. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे बोलणे कठोर वाटेल. मुद्दे पटणार नाहीत. वाटाघाटीत नुकसान होईल. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनतच होईल. कौतुक होईल. पण प्रसिद्धी कमी पडेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. गुप्त कारवाया  त्रस्त करतील.


कर्क

चंद्र, गुरु युती, रवि, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. मोठे काम पूर्ण कराल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार तणाव, वाद होईल. गुप्तशत्रू कारवाया करतील. प्रति÷ा टिकून राहील. घरातील व्यक्तींना खूष ठेवता येईल. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मोठे आश्वासन मिळेल. कोर्टकेस संपवण्याची जिद्द ठेवा.


सिंह

 रवि, बुध युती, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. मोठय़ा ग्रहांची साथ नसली तरी बाकी ग्रह तुमच्या पाठीशी आहेत. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. नम्रपणा ठेवल्यास तुमचे हित साधता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील वाटाघाटीत, यशात संमिश्र प्रतिसाद मिळेल. गुरुवार, शुक्रवार तणाव होईल. कोर्टकेसमध्ये तत्परता ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.


कन्या

चंद्र, गुरु युती, रवि, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. गिऱहाईकांशी गोड बोला. मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. जवळचे लोक दगाफटका करतील. विश्वासघातामुळे राग वाढेल. कला,क्रीडा क्षेत्रात चमकाल. मैत्रीत दुरावा येईल. घरात क्षुल्लक कारणाने वाद होईल. खाण्या पिण्याची स्वत:ची काळजी घ्या. कोर्टकेस संपवता येईल. पैसे देऊन काम करू नका.


तुळ

रवि, चंद्र षडाष्टकयोग, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढलेला असेल. अतिशयोक्तीने कुठेही वागू नका. नोकरीत सावधपणे वागा. धंद्यात काम मिळेल. धावपळ वाढेल. वादाला महत्त्व देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात  वरि÷ांचा दबाव राहिल. प्रति÷ा कशी वाढेल या चिंतेत रहाल. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण वाटेल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे ध्येय गाठावे.


वृश्चिक

चंद्र, गुरु युती, रवि, चंद्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात सुधारणा होईल. कामे मिळतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून राहिल. काही जवळचे लोक कट करतील. संसारात कामे वाढतील. खाण्याची काळजी घ्या. दुखापत टाळा. कला,क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मैत्रीत वाद होईल. कोर्टकेस जिंकाल.


धनु

सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. रविवार, सोमवारी बाचाबाची होईल. धंद्यात समस्या येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांचा दबाव राहील. यश मिळणे कठीण वाटेल. संसारात आपली माणसे मदत करतील. नोकरीत काम वाढेल. कोर्टकेस कठीण असेल. कला,क्रीडा क्षेत्रात कौतुकावर समाधान मानावे लागेल. वृद्धांची काळजी वाटेल. व्यवहारात घाई नको.


मकर

चंद्र, गुरु युती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. मंगळवार, बुधवार तणाव, वाद होईल. संयमाने प्रश्न सोडवा. तुमची कामे होतील. धंदा वाढेल. जम बसेल. राजकीय, सामाजिक कार्यात गैरसमज होईल. तुमचा प्रभाव वाढेल. कला,क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत बदल करता येईल. कोर्टकेस लवकर संपवा. संसारात खर्च वाढेल. अंदाज चुकेल.


कुंभ

रवि, बुध युती, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अचानक समस्या येईल. कायद्याचा त्रास होईल. राजकीय, सामाजिक कार्यात गुरुवार, शुक्रवार तुमच्यावर टीका होईल. तुमचे बोलणे जाचक वाटेल. नोकरीत काम वाढेल. कला, क्रीडा  क्षेत्रात कौतुक होईल.  कामाचे आश्वासन मिळेल. कोर्टकेसमध्ये योग्यतेच मुद्देs मांडा. मुलांच्या बरोबर तणाव होईल. पोटाची काळजी घ्या.


मीन

रवि, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. या सप्ताहात महत्वाची कामे होतील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात फायदा होईल. वाढ करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मोठे यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्टकेस संपवता येईल. घर,वाहन, जमीन घेता येईल. परदेशात जाण्याचा योग येईल. आनंदी व्हाल.