|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पियाळी येथून युवती बेपत्ता

पियाळी येथून युवती बेपत्ता 

कणकवली:

पियाळी – करमळकरवाडी येथील नीलम अरुण कोलते (23) ही बुधवारी 15 मेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर तिचे वडील अरुण शंकर कोलते (50, पियाळी – करमळकरवाडी) यांनी पोलिसांत दिली.

फिर्यादीनुसार, नीलम ही तळेरे येथील सुपरमार्केट येथे कामाला आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता सुपरमार्केट येथील कामावर जाते, असे सांगून ती घरातून बाहेर पडली. पण, सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी नातेवाईक व अन्यत्र तिचा शोध घेतला. मात्र, ती अद्यापपर्यंत न सापडल्याने तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची खबर दिली. नीलमची उंची पाच फूट, रंग सावळा, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, गळय़ात सोन्याचे चेन, केस लांब, नाक सरळ व पायात सँडल असून अशा वर्णनाची युवती आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.