|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी कंडक्टरला मारहाण; सुमो चालकावर गुन्हा

एसटी कंडक्टरला मारहाण; सुमो चालकावर गुन्हा 

कणकवली:

एसटी बसला अडथळा होत असल्याच्या कारणावरून मागील सुमो बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून बस वाहक बुधाजी लक्ष्मण कासार (32, माजगाव-सावंतवाडी) यांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी सुमो चालक शरद शंकर गुरव (खारेपाटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खारेपाटण बसस्थानक येथे शनिवारी सकाळी 9.20 वा. सुमारास घडली.

कासार यांच्या फिर्यादीनुसार, ते व चालक संदीप दामोदर कोटगी (माजगाव-सावंतवाडी) हे सावंतवाडी-रत्नागिरी बस (एमएच-14/बीटी-209) घेऊन जात होते. बस खारेपाटण बसस्थानकावर आली असता स्थानकावर टाटा सुमो (एमएच-08/आर-4690) उभी होती. वाहतूक नियंत्रकांनी ‘अनाऊन्समेंट’ केल्यानंतर सुमोचालक शरद गुरव याने सुमो बाहेर काढली. मात्र, बस स्थानकात लागल्यानंतर गुरव याने सुमो पुन्हा बसच्या मागे आणून उभी केली. परिणामी बस मागे घेता न आल्याने वाहक कासार यांनी गुरव याला सुमो तेथून हलविण्यास सांगितले. त्यावर सुमो चालकाने शिवीगाळ करत खाली उतरून कासार यांच्या कानशिलात लगावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.