|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » केदारनाथच्या गुहेत मोदींची ध्यानधारणा

केदारनाथच्या गुहेत मोदींची ध्यानधारणा 

भगवान केदारनाथाचे दर्शन घेत केली पूजा : विकासकामांचा घेतला आढावा, बदिनाथ मंदिराला देणार भेट, परिसरात कडेकोट बंदोबस्त

वृत्तसंस्था/ केदारनाथ

 पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दोन दिवसीय दौऱयानिमित्त केदारनाथ येथे पोहोचले. केदारनाथ येथील मंदिरात पूजा केल्यावर दोन किलोमीटर उंच चढून जात तेथील गुहेत मोदींनी ध्यानधारणा चालविली असून ते रविवार सकाळपर्यंत ध्यानस्थ राहणार आहेत. केदारनाथ क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱयांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. केदारनाथ येथेच शनिवारी रात्री त्यांनी वास्तव्य केले असून आज बद्रीनाथचे दर्शन ते घेणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने उत्तराखंड दौऱयाची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. मोदींच्या या दौऱयाबद्दल आम्हाला कुठलाच आक्षेप नाही. पंतप्रधानांचा हा अधिकृत दौरा आहे. आचारसंहिता अद्याप लागू असल्याची आठवण पीएमओला करून दिल्याचे आयोगाच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.

केदारनाथ येथे हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर पंतप्रधान तेथील पारंपरिक गढवाली पोशाख तसेच पहाडी टोपी आणि कंबरेला भगव्या रंगाच्या वस्त्रासह दिसून आले. हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूला उपस्थित भाविक आणि स्थानिक जनतेला त्यांनी हात उंचावून अभिवादन केले आहे. मोदींच्या आगमनाने उत्तराखंडची जनता आणि पक्ष अत्यंत उत्साहित असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केले आहे.

विजयासाठी मागितला आशीर्वाद

पंतप्रधानांच्या या दौऱयाचा उद्देश पूर्णपणे आध्यात्मिक आहे. पण मोदींच्या या दौऱयादरम्यान 19 मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. याच टप्प्यात मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीही सामील आहे. 23 मे रोजी लागणाऱया निकालापूर्वी मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या मैदानात पूर्ण शक्तिनिशी प्रचार केल्यावर मोदी आता देवाच्या चरणी विजयासाठी आशीर्वाद मागणार आहेत.

9 मे रोजी दर्शनास प्रारंभ

यंदा 9 मे रोजी केदारनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले होते. तेथे एकावेळी 6 हजार लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा मार्गात 300 हून अधिक तंबू निर्माण करण्यात आले आहेत. 10 मे रोजी बद्रिनाथ मंदिर दर्शनासाठी खुले झाले होते.

केदारनाथचा चौथा दौरा

पंतप्रधान झाल्यावर मोदी पहिल्यांदाच केदारनाथमध्ये वास्तव्य करणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोदींनी केदारनाथचा दौरा करत जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2017 मध्ये देखील त्यांनी (मे आणि ऑक्टोबर) दोनवेळा केदारनाथला भेट दिली होती.

गुहेत केले ध्यान

पंतप्रधान मोदींनी केदारनाथ येथील गुहेत ध्यानधारणा केली. अकरावे ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथची समुद्रसपाटीपासून असलेली उंची 11,700 फूट इतकी आहे. तर मंदिर परिसरापासून दीड किलोमीटर अंतरावर निर्माण करण्यात आलेली ध्यान गुहा 1225 फूट उंचीवर स्थित आहे. पुनउ&भारणीची जबाबदारी स्वीकारल्यावर मोदींनीच केदारनाथ गुहेच्या पुनर्निर्मितीचे निर्देश दिले होते. यंदा महाराष्ट्राचे जय शाह हे मोदींनंतर गुहेत थांबणारे दुसरे भाविक ठरणार आहेत.

Related posts: