|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बौद्ध महासभेतर्फे बुद्धपौर्णिमा उत्साहात

बौद्ध महासभेतर्फे बुद्धपौर्णिमा उत्साहात 

बुद्ध प्रतिमेची मिरवणूक : माजी आमदार संभाजी पाटील यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बेळगाव व विविध संघटनाच्यावतीने बुद्ध पौर्णिमा शनिवारी सदाशिवनगर येथील बुद्ध विहारमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी बुद्ध विहारमध्ये बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना देण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाला बीएसएनएलचे शिंदे, पी. बी. चलवादी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. खडे बाजार पोलीस स्थानकाचे एसीपी  ए. चंद्रप्पा यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेच्या मिरवणुकीला सुरुवात केली. प्रारंभी माजी आमदार संभाजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, सिव्हिल हॉस्पिटड रोड मार्गे सदाशिवनगर येथील बुद्ध विहार येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दरम्यान डॉ. आंबेडकर उद्यानात समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सांयकाळी बुद्ध विहारमध्ये डॉ. सावकार कांबळे, प्रा. विनोदकुमार पाटील यांनी बौद्ध धर्म व डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या विषयी अधिक माहिती देऊन मार्गदर्शन केले.

याप्रसंगी संजयकुमार शिंदे, विक्रम खोकणे, यशवंत सम्राट, दिपक मेस्त्री, एस. एस. हरळी, एस. एच. कांबळे, सुरेश घराणे, कलपत्री, सागर, प्रफुल सुर्यवंशी, रमेश शिरहट्टी, किरण पाटणकर, के. डी. मंत्रेशी, अशोक कांबळे, प्रकाश कांबळे, इंदूमती पाटणकर यासह विविध संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.