|Thursday, December 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेचे यशस्वी शतक

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेचे यशस्वी शतक 

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या दुसऱया पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे. मालिकेच्या पुढच्या भागात नेमके होणार तरी काय याचेच कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळते. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच या दुसऱया भागावरही प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचे बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांना जाते. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.

या मालिकेने नुकताच 100 भागांचा पल्ला गाठला. या यशस्वी शतकाचा आनंद संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे ही मालिका यशस्वीरित्या 100 भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. यावेळी टीमच्या कलाकारांनी सांगितले की, कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related posts: