|Friday, November 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » टिपूजीच्या मदतीने बालरंगभूमीने टाकली कात

टिपूजीच्या मदतीने बालरंगभूमीने टाकली कात 

समाजाचा आरसा असणारे एक उत्तम माध्यम म्हणून नाटक किंवा रंगभूमीकडे पाहिले जाते. रंगभूमी आपल्याला नेहमीच आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देत असते. असाच एक वेगळा दृष्टीकोन घेऊन “टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’’ या बालनाटय़ाने रंगभूमीवर दमदार पदार्पण केले आहे. यंदाची उन्हाळय़ाची सुट्टी अधिकच सुखद बनविण्याकरिता बालमित्रांसाठी थिएटर कोलाज निर्मित आणि अपूर्वा प्रोडक्शन प्रस्तुत “टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’’ हे बालनाटय़ सज्ज झाले आहे.

  दर्जेदार अभिनयाने कलाक्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप उमटवणाऱया पल्लवी वाघ-केळकर यांनी या बालनाटय़ाचे दिग्दर्शन केले असून मूळ कथा संकल्पना सुद्धा त्यांचीच आहे. एका उत्तम आशयाचे हे बालनाटय़ रंगभूमीवर सादर करण्यासाठी अपूर्वा प्रॉडक्शनचे संस्थापक सुमुख वर्तक यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे. नेपथ्य मार्गदर्शन सचिन गावकर, संगीत संयोजन अनुराग गोडबोले, प्रकाश योजना योगेश केळकर, रंगभूषा उल्हेश खंदारे या सर्वाच्या मेहनतीने हे नाटक प्रेक्षकांच्या समोर सादर होत आहे. पल्लवी वाघसह 26 लहान मुलांचा हा समूह बाल नाटय़प्रेमींचा आणि बालकांचा उन्हाळा अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज आहे. या बालनाटय़ामध्ये सिद्धीरुपा करमरकर आणि अक्षय शिंपी या अनुभवी कलाकारांचा विशेष सहभाग आहे. नुकताच या नाटकाचा शुभारंभ राम गणेश गडकरी नाटय़गफह ठाणे येथे झाला.

Related posts: