|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रवादीचा जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

राष्ट्रवादीचा जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी/ सांगली

जिह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर असताना राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारला जनावरांच्या जिवांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना पैसे वाचवायचे आहेत. चारा छावण्यांच्या जाचक अटींमुळे त्या सुरू करण्यास कोणी तयार होत नाही, त्यामुळे जनावरांना छावणीत नको, दावणीला चारा देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेळ्या-मेंढय़ासह मोठय़ा प्रमाणावर जनावरे आणलेली होती.

दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, अरूण लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश ााsर्चामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, अरूण लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, सुरेश शिंदे, बसवराज दोडमणी, अर्जुन पाटील, ताजुद्दीन तांबोळी, हणमंतराव देशमुख, मन्सूर खतीब, मैन्नुद्दीन बागवान, मीनाक्षी आक्की, छायाताई पाटील, दीपक उनउने यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

जिह्याच्या पूर्व भागाला बघावं दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे दुष्काळाकडे दुर्लक्ष झाले होते. निवडणुका संपल्या तरी अद्यापि तातडीने उपाययोजना राबविल्या जात नाहीत. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव आणि कवठेमंकाळ या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱयाचा गंभीर प्रश्न बनला आहे. जनावरं चाऱयाअभावी तडफडू लागली असून जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱयांपुढे निर्माण झाला आहे. जनावरांसाठी चारा छावण्यांची मागणी केली जाते, मात्र छावण्यांसाठी असलेल्या जाचक अटींमुळे त्या सुरू करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

दुसरीकडे कर्नाटक सरकारने दुष्काळासाठी चांगले नियोजन करून लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे, मात्र राज्य सरकारला दुष्काळी जनतेचे काहीही देणेघेणे नसल्याचे टीका आ. जयंत पाटील यांनी यावेळी केली. जिह्यातील काही भागात छावण्या सुरू करण्यात आहेत परंतु त्या अपुऱया असल्याचे दिसते लहान जनावरांचे हाल होत आहे छावणीतील जनावरांना मिळणारे अनुदानही कमी आहे त्यामध्ये पुरेसा चारा मिळणार नाही मोठय़ा जनावरांना 120 रुपये तर लहान जनावरांना 70 रुपये देण्यात यावेत. छावण्यांमध्ये शेळ्या-मेंढय़ांचा ही सहभाग असायला हवा. दुष्काळी भागाची परिस्थिती लक्षात घेऊन  सरकारने  जनावरांना तरी दया दाखवावी, अशी मागणी मोर्चामध्ये करण्यात आली.

जनावरांच्या चाऱयाचा पिण्याच्या पाण्याचा आहे प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी भागात प्रत्यक्ष मिळणारे टँकर आणि कागदावरील टँकर यामध्ये तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. टँकरच्या खेपा मंजूर असल्या तरी प्रत्यक्षात सात खेपा पडतात, टँकरच्या खेपामध्ये सुरू असलेल्या गोल मालाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. रोहयो कामाची मागणी वाढली आहे, मात्र काम मिळत नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

 दरम्यान, भर उन्हात दुपारी एक वाजता विलिंग्डन महाविद्यालयाच्या प्रवेश व्दारापासून मोर्चाला सुरुवात झाली. दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आला. तेथे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्यासह पदाधिकाऱयांची भाषणं झाली. यावेळी उपस्थितांनी सरकावर सडकून टीका केली. 

Related posts: