|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खंडय़ा धाराशिवकरसह टोळके मालेमालच

खंडय़ा धाराशिवकरसह टोळके मालेमालच 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या काही वर्षांपासून खंडय़ा धाराशिवकर व त्याच्या टोळक्यांनी सातारा, फलटण व जिल्हय़ातील विविध ठिकाणी अवैध सावकारींचा पाश टाकून अनेकांना लुटले. अनेक कुटुंबे रस्त्यावर आणली. अनेकांच्या जमीनी, शेती, घर, बंगले, फ्लॅट स्वत:च्या व टोळीतील सहकाऱयांच्या नावावर करून घेतले.

गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया

या त्यांच्या कारनाम्यांमुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या टोळीला मोक्का लावला. मात्र या टोळक्याने गिळंकृत केलेली संपत्ती अद्यापही मुळ मालकांना मिळालेली नाही. कारण त्यामध्ये गुंतागुतीची कायदेशीर प्रक्रिया आड येत आहे.

खंडय़ा धाराशिवकर व टोळक्याने सावकारीच्या नावाखाली दहशत माजवत लुटालूट सुरू केली होती. यामध्ये अनेक शिक्षक, प्राध्यापक यांच्यासारख्या उच्चशिक्षित मंडळीचाही समावेश होता. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर बिळातून बाहेर निघावेत तसे एक-एक तक्रारदार पोलीस ठाण्यात येवू लागले व बघता बघता खंडय़ा धाराशिवकरने किती जणांवर अत्याचार अन्याय केला हे पाहून पोलीसही थक्क झाले.

पोलिसांनी खंडय़ाकडून जमीन खरेदीची, बंगला, घर, शेतजमीन खरेदीची कागदपत्रे जप्त केली. खरी मात्र ती पुन्हा मूळ मालकाला हस्तांतरित करण्यात आता कायद्याच्या अडचणी येवू लागल्या आहेत.

व्याजाने किरकोळ पैसे द्यायचे व मोठया प्रमाणात व्याज लावून त्या माणसाला अक्षरश: रस्त्यावर आणायचे, असा प्रकार खंडय़ा व त्याचे सहकारी करीत होते.

महसूल अधिकाऱयांची जबाबदारी

खंडय़ाला अटक करताना अनेकांनी हात धुवून घेतले. हे ही तितकेच खरे. परंतु खंडय़ा व टोळीला मोक्का लावून त्यांची रवानगी कळंबा कारागृहात झाली. हे अनेकांना दिलासा देणारे ठरले. परंतु अद्यापही अनेकांना आपली घरे, बंगले, शेती जी खंडय़ाने हडप केली होती. ती परत मिळाल्यास खरा दिलासा मिळणार आहे.

यासाठी पोलिसांपेक्षा महसुल अधिकाऱयांची जबाबदारी थोडी जास्त आहे. अन्यथा पुन्हा खंडय़ाच करोडपती राहील !

Related posts: