|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हलगा-मच्छे बायपासचे काम सोमवारीही सुरूच

हलगा-मच्छे बायपासचे काम सोमवारीही सुरूच 

न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आता शेतकऱयांनी पुढे येणे गरजेचे

प्रतिनिधी/ बेळगाव

हलगा-मच्छे बायपासचे काम सोमवारीही सुरूच ठेवण्यात आले होते. बेकायदेशीररीत्या ही जमीन कब्जात घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱयांना न्यायालयीन लढाई लढता येणार आहे. त्यासाठी आता शेतकऱयांनी पुढे येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केवळ एक नोटीस देऊन ही जमीन कब्जात घेतली आहे तर काही जणांना नोटीसही देण्यात आली नाही. त्यामुळे हे सर्व काम बेकायदेशीर असून न्यायालयीन लढाई लढता येणार आहे. यासाठी शेतकऱयांनी आता एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे.

शेतकऱयांनी जोरदार विरोध करूनदेखील महामार्ग प्राधिकरणाने हलगा-मच्छे बायपाससाठी सुपीक जमीन ताब्यात घेतली. शेतकऱयांच्या उभ्या पिकातून जेसीबी घालून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः तळमळत आहेत. आपली सर्व जमीन जाणार असल्याने अनेक शेतकरी व त्यांचे कुटुंबीय तणावाखाली वावरताना दिसत आहेत. केवळ शेतकरीच नाही तर त्यांची लहान मुलेदेखील तणावाखाली आहेत. राजकीय मंडळी केवळ शेतकऱयांची दिशाभूल करत आहेत. यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

शेतकरी पिढय़ान्पिढय़ा या जमािनीवरच जीवन जगत आले आहेत. मात्र, अचानक ही जमीन हिसकावून घेतल्यामुळे अनेक शेतकऱयांना मोठा धक्का बसला आहे. सर्व्हे एका ठिकाणाहून तर रस्ता दुसरीकडे अशी अवस्था झाली आहे. त्याला शेतकऱयांनी जोरदार विरोध केला होता. पण पोलीस संरक्षणात दडपशाही करून  रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड करण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा न्यायालयीन लढाई लढून या रस्त्याचे काम थांबविण्यासाठी काही शेतकरी प्रयत्न करत आहेत.

हलगा ते मच्छे बायपास हा साडेबारा कि.मी.चा रस्ता तब्बल 200 ते 220 फुटांचा होत आहे. इतक्मया मोठय़ा रस्त्यामध्ये अनेक शेतकरी पूर्णपणे भूमीहीन झाले आहेत. सरकारकडून मिळणाऱया तुटपुंज्या रकमेमधून जमीन मिळणे कठीण आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकऱयांना नोटिसाच देण्यात आल्या नाहीत. त्यांची जमीन या रस्त्यामध्ये गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱयांना नुकसान भरपाईही देण्यात आली नाही. तरीदेखील त्यांच्या शेतातून हा रस्ता केला जात आहे. यामुळे कशा प्रकारे बेकायदेशीररीत्या या रस्त्याचे काम सुरू आहे हे दिसून येत आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये जवळपास 160 हून अधिक एकर जमीन जात आहे. ही सर्व जमीन सुपीक आहे. अनेकांनी ऊस व भाजीपाला पिकविला होता. त्यांच्या शेतामधूनच हा रस्ता होत आहे. त्यामुळे महिला शेतकरी अक्षरशः हतबल झाल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून या रस्त्याला विरोधासाठी इतर सर्व कामे सोडून महिलावर्ग धडपडताना दिसत आहे. विरोध केला असता महिलांनाही अटक करण्यात आली आहे. एक प्रकारे जणू दडपशाहीच सुरू आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय शेतकऱयांसमोर पर्याय नाही. यासाठी एकजुटीनेच आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शेतकऱयांनी सज्ज होणे गरजेचे आहे.