|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » गोव्यात 27 पासून अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

गोव्यात 27 पासून अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन 

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजन, 8 जूनपर्यंत चालणार अधिवेशन

बेळगाव / प्रतिनिधी

हिंदू समाजाला त्यांच्या शक्तीची जाणीव करून संघटितपणे हिंदू राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरविणे आवश्यक आहे. यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे यावषीही ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ भरविण्यात येणार आहे. दि. 27 मे ते 8 जून या कालावधीत फोंडा गोवा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे अधिवेशन भरणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक गुरुप्रसाद गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘यंदा आठवे हिंदू अधिवेशन भरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या सात वर्षातील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे देशभरात हिंदू राष्ट्र या संकल्पनेविषयी मोठी जागृती झाली आहे. या अधिवेशनाला भारतातील 26 राज्यांसह बांगलादेशसहीत 200 हून अधिक हिंदू संघटनांचे 800 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. केंद्रात नवीन सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम 370 रहित करणे, गोवंश हत्त्या बंदी, धर्मांतर बंदी, अयोध्येत श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंच्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्या-समस्या यावर या अधिवेशनात विचारमंथन होणार आहे. तसेच केंद्र सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडण्याच्या दृष्टीने संघटनात्मक प्रयत्नांची निश्चिती या अधिवेशनाद्वारे केली जाणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदू बांधवांचे रक्षण करण्याच्या संदर्भातही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती गौडा यांनी यावेळी दिली.

दि. 27 आणि 28 मे रोजी हिंदू अधिवक्ता अधिवेशन होणार आहे. याच दिवशी उद्योगपती अधिवेशनाचे अधिवेशनही आयोजित करण्यात आले आहे. 29 मे ते 4 जून या कालावधीत हिंदूत्व नि÷ांचे सात दिवसीय ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन होईल. सोशल मिडियाच्या क्षेत्रातील विचारवंतांसाठी रविवार दि. 2 जून रोजी सोशल मिडिया कॉन्क्लेव्हचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती गौडा यांनी दिली. याप्रसंगी सनातन संस्थेचे उज्ज्वला गावडे, ग्रामपंचायत माजी सदस्य पंकज घाडी उपस्थित होते.