|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » फिफाच्या निरीक्षण समितीकडून भारतातील फुटबॉल केंद्राची पाहणी

फिफाच्या निरीक्षण समितीकडून भारतातील फुटबॉल केंद्राची पाहणी 

वृत्तसंस्था \ पणजी

2020 साली होणाऱया फिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी फिफाकडून पाहणी करण्यात आली आहे. फिफाच्या निरीक्षण समितीने भारतातील विविध फुटबॉल केंद्रांना भेटी देवून तेथील सुविधांची पाहणी केली. दरम्यान ही स्पर्धा भारतात भरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे या स्पर्धेकरिता इच्छुक केंद्रांच्या यादीमध्ये बदल केला असून आता या यादीत पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

तीन वर्षांच्या कालावधीत भारत ही स्पर्धा दुसऱयांदा भरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे फुटबॉल केंद्रांच्या यादीमध्ये गोवा, अहमदाबाद, भुवनेश्वर, कोलकाता आणि मुंबई या शहराचा समावेश करण्यात आला आहे. फिफाची 2017 सालातील महिलांची 17 वर्षांखालील वयोगटाची फुटबॉल स्पर्धा भारतात भरविली गेली होती आणि या स्पर्धेत 24 संघांचा समावेश होता. स्पर्धेतील सामने सहा विविध ठिकाणी खेळविण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात फिफाच्या निरीक्षण समितीने अहमदाबादला भेट दिली तर हे पथक गुरूवारी गोव्याला भेट देणार आहे. 2020 च्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपद शर्यतीमध्ये भारत, अर्मेनिया आणि फ्रान्स यांचा समावेश आहे पण भारताला या स्पर्धेचे यजमानपद फिफाने बहाल केले आहे.