|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » हनुमा विहारी विवाहबंधनात

हनुमा विहारी विवाहबंधनात 

वृत्तसंस्था \ हैदराबाद

धावांचा पाऊस पाडणारा धमाकेदार क्रिकेटपटू म्हणून परिचित असलेला हनुमा विहारीचा रविवारी 19 मे रोजी विवाह झाला. डिझायनर प्रिती राय या मैत्रिणीशी त्याने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सिनेस्टाईलने गुडघ्यावर बसून विवाहची मागणी घातल्याने दोघे चर्चेत होते. तेलंगणामधील वारंगलमध्ये 25 वर्षीय हनुमा व
प्रीतीचा विवाह झाला. तिच्याशी झालेल्या विवाहाचे फोटो शेअर करुन त्याने ‘तुझे हास्य आयुष्यभर कायम ठेवीन’ असे भावनिक उद्गार टाकून सोशलमाध्यमाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 हनुमाने सुरुवातील हैदराबाद व आंधप्रदेशकडून खेळताना दे-दणादण धावा चोपल्या होत्या. यामुळे भारतीय निवड समितीचे त्याच्याकडे लक्ष गेले नसते तर नवलच. गतवर्षी भारतीय क्रिकेट संघाकडून सुरुवात करणाऱया हनुमाने  इंग्लंडविरोधात शानदार 56 धावा ठोकून दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यंत तो केवळ 4 कसोटी सामने खेळला व 167 धावा करण्यात यशस्वी झाला आहे. तसेच 5 बळींची सख्याही त्याच्या नावावर आहे. अशा अष्टपैलू हनुमास आयपीलमध्ये मात्र फारशी चमक दाखवायची संधी मिळाली नाही.