|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » ‘फोर्ड मोटर्स’कडून होणार 7 हजार नोकर कपात

‘फोर्ड मोटर्स’कडून होणार 7 हजार नोकर कपात 

सर्व प्रक्रिया ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण होणार

वृत्तसंस्था \ वॉशिंग्टन

अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्डकडून मोठय़ाप्रमाणात नोकर कपात करण्यात येणार आहे. फोर्ड मोटर्स 7 हजार कर्मचाऱयांना कमी करणार असून जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात होणार आहे. त्याचबरोबर बऱयाचशा कर्मचाऱयांच्या कामाची पुनर्रचना देखील करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीकडून नियोजन झाले आहे, अशी माहिती फोर्डकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेतील सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन फोर्डने कमी केले आहे. कारण बहुतांश अमेरिकी नागरिक पिकअप ट्रक आणि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेहिकलचा वापर करू लागले आहेत. फोर्डने याआधीच उत्तर अमेरिकेतील वेगवेगळय़ा उत्पादन प्रकल्पांमधून नोकर कपातीला सुरुवात केली आहे. यामुळे कंपनीची 60 कोटी डॉलरची बचत होणार आहे.

फोर्डने उचलली पाऊले

2018 च्या अखेर फोर्डकडे 199000 कर्मचारी कार्यरत होते. तर त्याआधीच्या वषी फोर्डमधील एकूण कर्मचाऱयांची संख्या 202000 इतकी होती. मार्च महिन्यात फोर्डने जर्मनीतील प्रकल्पातून 5000 कर्मचाऱयांची कपात केली. ब्राझिल आणि रशियामधील मोठय़ा आकाराच्या व्यावसायिक ट्रकच्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठीही फोर्डने ही पाऊले उचलली होती.