|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » आता ट्रायच्या नियंत्रणात येणार ‘वेब ऍप’!

आता ट्रायच्या नियंत्रणात येणार ‘वेब ऍप’! 

परवाना कक्षेत आणण्याचा प्रस्ताव   हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, सोनी लाइव्हचा समावेश  

वृत्तसंस्था \ नवी दिल्ली

हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, सोनी लाइव्ह आदी वेब ऍपना अन्य उपग्रह वाहिन्यांप्रमाणे परवान्याच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाला ट्राय (दूरसंचार नियामक प्राधिकरण) कडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सध्या नियंत्रणमुक्त असणारी ही वेब ऍप लवकरच ट्रायच्या देखरेखीखाली येण्याची शक्मयता आहे.

भारतात अल्प कालावधीतच ही ऍप लोकप्रिय झाली असून त्यातून प्रसारित होणाऱया वेबमालिका, विशेष कार्यक्रम यांना प्रचंड मागणी वाढली आहे. या ऍपवरून टीव्ही चॅनल पहाण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र त्यांच्यावर सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही.  

अतिरिक्त परवाना चौकट अनावश्यक

ट्रायच्या या प्रस्तावाला वेब ऍपकडून जोरदार विरोध होण्याची शक्मयता असून काही उपग्रह वाहिन्यांनी स्वत:ची वेब ऍप सुरू केल्याने दुहेरी परवाना शुल्क भरण्यास ते तयार होणार नाहीत. प्रेक्षकांना टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम पहाता यावेत यासाठी ओटीटी हे केवळ एक नवे माध्यम आहे. उपग्रह वाहिन्या आधीच ट्रायच्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे या वेब ऍपसाठी अतिरिक्त परवाना चौकट निर्माण केली तर ती अनावश्यक ठरेल, असे मत एमएक्स प्लेअर्सचे सीईओ करण बेदी यांनी व्यक्त केले.

‘वेब ऍप’ कोणत्याही शुल्काशिवाय…

सेवा पुरवठादारांकडून टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी केबल ऑपरेटर किंवा उपग्रह कंपन्यांना कण्टेन्ट पुरवला जातो. मात्र यासाठी एक परवाना चौकट आखण्यात आली आहे. या सेवा पुरवठादारांना संबंधित नियमांसह निर्धारित शुल्क भरावे लागते. वेब ऍप मात्र यास अपवाद असून कोणत्याही शुल्काशिवाय टीव्ही चॅनेलसह मालिकांचे प्रसारण करते. त्यामुळे या ऍपना ट्रायच्या कक्षेत आणणे शक्मय आहे का, यावर सध्या विचार सुरू आहे, असे ट्रायच्या वरि÷ अधिकाऱयाने सांगितले.