|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निरगुण केवल सात गुणांसह आघाडीवर

निरगुण केवल सात गुणांसह आघाडीवर 

प्रतिनिधी \ सांगली

कै. बाबुकाका शिरगांवकर फिडे मानांकन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये सातव्या फेरीअखेर निरगुण केवल 7 गुणासह प्रथम स्थानावर तर  हितेश जरीया, आदित्य सावळकर, गोपाळ राठोड, अंजनेय फाटक, श्रीराज भोसले 6 गुणासह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. रोहित पाटील, अनिश गांधी,आर. बालसुब्रम्हण्यम, वरद आठल्ये,अखिलेश नागरे. प्रणव पाटील, हेरंब भागवत, तनिषा बोरमणीकर, शैलेश रावळ, श्रीया रेवणकर 5.5 गुणासह संयुक्त तिसऱया स्थानावर आले आहेत.  

  नूतन बुध्दिबळ मंडळाच्या 52 व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील कै. शिरगांवकर फिडे मानांकन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत कोल्हापूरचा अनिश गांधी व पुण्याचा निरगुण केवल यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्याद्याने झाली. आघाडीवर असलेल्या अनिशने रचलेल्या चालीना निरगुणने जशास तसे प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यात अनिशने रचलेल्या चालीना निरगुणने प्रत्युत्तर देऊन डावावर वर्चस्व राखले. डावाच्या अखेरीस अनिशला कोंडीत पकडून 41 व्या चालीला निरगुणने डाव सोडावयास लावला. मध्यप्रदेशचा हितेश जरीया व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावाची सुरूवात घोडय़ाच्या चालीने झाली. राजाकडील बाजू मजबूत करून चाली रचणाऱया हितेशला श्रीराजने सुरूवातीपासून जशास तसे प्रत्युत्तर दिले डावाच्या मध्यात दोघांनी एकमेकांना शह देऊन, विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर 49 व्या चालीला दोघांनी डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आपली आघाडी कायम केली.

  अंजनेय फाटक व कस्टमचा किरण पंडितराव यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्याद्याने झाली. अंजनेयने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या किरणचा  राणी व हत्तीच्या साहयाने 27 व्या चालीला पराभूत केले. आंध्रप्रदेशचा राव जे मल्लेश्वर व कोल्हापूरचा आदित्य सावळकर यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्याद्याने झाली. राजाकडील बाजू मजबूत करून मल्लेश्वरने  रचलेल्या चालीना आदित्यने जशास तसे प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यात मल्लेश्वरने आदित्यला कोंडीत पकडून शह देण्याचा प्रयत्न केला अखेर आदित्यने शह परतावून लावत मल्लेश्वरच्या राजाला कोंडीत पकडून 60 व्या चालीला डाव सोडावयास लावला.

  रोहित पाटील व अखिलेश नागरे यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्याद्याने झाली. डावाच्या सुरूवातीला दोघांनी राजाकडील बाजू मजबूत करून चाली रचल्या. रोहितने रचलेल्या चालीना अखिलेशने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले अखेर 36 व्या चालीला डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आपली आघाडी कायम केली. ठाण्याचा गोपाळ राठोड व कोल्हापूरचा आयुष महाजन यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्यादयाने झाली गोपाळने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या आयुषचा 19 व्या चालीला पराभव केला.

  तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीयमास्टर आर. बालसुब्रम्हण्यम व महाराष्ट्राचा अनिकेत  बापट यांच्यातील डावाची घोडयाच्या चालीने झाली. अनुभवी असणा-या बालसुब्रम्हण्यमने रचलेल्या चालीना अनिकेतने राजाकडील बाजू मजबूत करून चाली रचल्या. डावाच्या मध्यात बालसुब्रम्हण्यमने राणी व हत्तीच्या साहयाने दिलेले शह परतावून लावण्यात अपयशी ठरलेल्या अनिकेतला 42 व्या चालीला डाव सोडावयास लावला. कोल्हापूरचा प्रणव पाटील व पुण्याचा समीर इनामदार यांच्यातील डावाची सुरूवात राजाच्या प्याद्याने झाली. प्रणवने रचलेल्या चालीना समीरने राणी व हत्तीच्या साहाय्याने प्रत्युत्तर दिले डावाच्या अखेरीस प्रणवने समीरला कोंडीत पकडून 27 व्या चालीला डाव सोडावयास लावला.त