|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मल्हारराव होळकर यांचा खरा इतिहास पुढे आलाच नाही

मल्हारराव होळकर यांचा खरा इतिहास पुढे आलाच नाही 

प्राचार्य मधुकर सलगरे यांची खंत

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पाणीपतच्या इतिहासात मल्हारराव होळकर लढले नाहीत, असा खोटा इतिहास इतिहासकारांनी लिहला आहे. पण मल्हारराव होळकर आणि रघुनाथ पेशवे यांच्या रणनितीमुळेच मराठय़ांचा अटकेपार झेंडा लागला. इतिहासकारांनी मल्हारराव होळकर यांचा खरा इतिहास लिहलाच नाही, अशी खंत व्यक्त करीत, म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे, असेही प्राचार्य मधुकर सलगरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, युवक संघटना व अहिल्या वाहिणी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ऍड. रणजित गावडे यांची कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

प्राचार्य सलगरे म्हणाले, 1630 मधला मराठय़ांचा इतिहास सोडला तर खरा इतिहास समोर आलेलाच नाही. सत्याचा शोध घेवून इतिहास लिहला पाहिजे, पण काही इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण लिखान केले नसल्याने मल्हारराव होळकर यांची खरी ओळख समाजासमोर आलेली नाही. पण मी 2009 मध्ये मी ‘हिंदुस्थानचा युग पुरूष मल्हारराव होळकर’ ग्रंथाच्या माध्यमातून मल्हारराव होळकरांचा खरा इतिहास लिहला आहे, असा दावा सलगरे यांनी केला. तसेच मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर या तीन व्यक्तीरेखा इतिहासात अतिशय महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाईतील गनिमा कावा ही पध्दत मल्हारराव होळकरांनी आवलंबली होती. म्हणूनच मराठय़ांचा आटकेपार झेंडा लावण्यात ते यशस्वी झाले. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मृत्यूनंतर लाहोर राजधानीवर राज्य केले, असे सांगत सलगरे यांनी मल्हारराव होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. रणजित गावडे म्हणाले, धनगर समाजाला पुरोगामी विचाराचा वारसा आहे. बुध्दीमता आणि कल्पकतेच्या जोरावर मेंढरांनाही शिस्त शिकवणाऱया समाजाने एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत बसत नाही. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी नुकतीच निवड झाली, तेंव्हा कोल्हापुरमध्ये सर्कीट बेंच आणण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे, असेही ऍड. गावडे यांनी सांगितले.

यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, एन. डी. बोडके, बाबुराव बोडके, भय्याजी शेळके, एन. डी. बोडके, छगन नांगरे, प्रल्हाद देबाजे, बाळासाहेब दाईंगडे आदी उपस्थित होते.