|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऍड.शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेच्या प्रधान कार्यालयाचा प्रारंभ

ऍड.शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेच्या प्रधान कार्यालयाचा प्रारंभ 

कोल्हापूर

ऍड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या नवीन प्रधान कार्यालयाचे उद्घाटन दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँकेच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती सुमित्रादेवी शामराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

भाऊसिंगजी रोडवरील बँकेच्या प्रधान शाखेच्या इमारतीत दुसऱया मजल्यावरील या नवीन इमारतीत हे प्रधान कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या नव्या प्रधान कार्यालयाद्वारे ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सुविधा पुरविण्यात येतील, असे मनोगत सुमित्रादेवी शिंदे यांनी व्यक्त केले. अध्यक्षा सुलोचना नाईकवाडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दत्तात्रय इंगवले यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.