|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुऱया चालल्या रानात…….सुरू झाली पेरणी

कुऱया चालल्या रानात…….सुरू झाली पेरणी 

प्रतिनिधी/ गारगोटी

  रोहिणी नक्षत्र निघण्यास अजून अवधी असतानाही शेतकऱयांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. ‘रोहिणीचा पेरा अन् सोन्याचा तुरा’ अशी एक म्हण पूर्वीपासून ग्रामीण भागात आहे त्याचे अनुकरण करतच धुळवाफ पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. यंदा उसाचा हंगाम लवकर संपल्याने भाताची शेते तयार होवू लागली आहेत.उन्हाळी भुईमूग काढणी सुरू असून त्याच रानामध्ये पावसाळी भात पेरण्यां होतात. पंरापरागत भात लागणी पेक्षा सुधारीत भातांना मागणी शेतकऱयांच्याकडून होत आहे.

   भुदरगड तालुक्यातील पूर्व भागात भात पेरणीला सुरवात झाली असून पश्चिम भागात रोपांचा तरवा टाकणीसाठी शेतकयांची धावपळ सुरू झाली आहे. या शेतकयांना सुधारित आणि संशोधित वाण देण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालक तयारीत आहेत. महाराष्ट्रात पश्चिम घाट आणि कोकण विभागात पावसाळ्यातील प्रमुख पीक भाताची लागवड केली जाते. भुदरगड तालुका हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तालुक्याच्या पूर्वेला तुलनेने पाऊस कमी असल्याने पेरणी आणि टोकन तर पश्चिम विभागात जादा पर्जन्यमान असल्याने रोप लागण केली जाते. तालुक्यातील खरीप हंगामात तेरा हजार 174 हेक्टरवर भात ,चौतीसशे दहा हेक्टर वर नाचणी,चार हजार सातशे बावन हेक्टरवर भुईमूग ही प्रमुख तर कारळा, सोयाबीन,तूर,उडीद,मूग ही अल्प प्रमाणात पिके घेतली जातात.

        खरीप हंगामात भात बियाणे निवडीसाठी मोठा वाव मिळत असून अनेक नामवंत राष्ट्रीय व परराष्ट्रीय कंपन्या आपले संशोधित आणि संकरित बीबीयांणे बाजारात उतरली आहेत. पारंपरिक भात वाणाना असणारी मागणी लक्षात घेऊन खाजगी कंपन्यांनी समांतर वाण बाजारात आणली आहेत.गत हंगामातील बियाण्यांच्या दरात कोणतीही वाढ अथवा घट न केल्याने शेतकरी सुखावला आहे.

         हळव्या, निमगरव्या, गरव्या जातींची बियाणी सुधारित, निवडक, उन्नत जाती , बारीक तांदूळ, मध्यम तांदूळ व सुवासिक तांदूळ,मिळवून देणाया असंख्य जातींची बियाणी उपलब्द्ध होत आहेत.पूनम, खुशी,श्रीकरगोल्ड, बलवान ,श्वेता ,दप्तरी, रुची, अर्ली, ओम3, निर्मल, क्रांती, पूनम गोल्ड ,सुंदर 606,असे हळवे वाण, शुंभागी मोहिनी,आवणी, आमानी, कोमल, सौभाग्य, सौभाग्य 505 ,सुप्रीम व कावेरी सोना ,अस्मिता, वीरा रिजॉईस5491,रम्या प्रसन्ना, श्रीराम88, वैष्णवी, साईराम 9,वायएसआर इंद्रायणी, रचना ,आर 1 व 24, अशा निंम गरव्या व गरव्या, सयाद्री, क्ज् 9090, सुरुची 5629 व5632, गोरखनाथ 509,किरण,सुपर कल्पना, रायझर धनदेव उन्नत जाती अशा असंख्य वअशा आकर्षक नावांनी बियाणी उपलब्द्ध होत आहेत. अनेक कंपन्यां भिंती पत्रिका, जाहिराती, माहिती पत्रिकाद्वारे आपले वाण अधिक उत्पादन देते याची माहिती थेट शेतकऱयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बियाण्यांची विक्री करणाया सर्व कंपन्यांनी शासनाकडून आपली बियाणे प्रमाणित करून घेतलेली असतात.याशिवाय  अधिकारी विक्री केंद्रांवर जाऊन वानांची कसून माहिती घेतात.शेतकयांनी वाणांची पिशवी ही वरच्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावीत .या पिशवीत थायरम ची छोटी पिशवी असते ती पिशवी फोडून संपूर्ण बियाण्याला ती पावडर (भुकटी) चोळावी .बियाणे विक्री करणारे दुकानदार जर चुकीचे उत्पादन विकत असतील तर तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.

       ए.डी.भिंगारदेवे

      तालुका कृषी अधिकारी भुदरगड

 

विविध कंपन्याकडून बाजारात उपलब्ध  केले जाणारे भात वाण आम्ही पडताळणी केल्या शिवाय विक्रीसाठी पाठवीत नाही . उत्पादन क्षमता ती आपल्या विभागातील जमिन,पाऊस, हवामानाला योग्य आहेत की नाहीत? शासन प्रमाणित आहेत की नाहीत? कृषी विद्यापीठाने शिफारस केली की नाही? याची शहानिशा केल्याशिवाय विक्रीसाठी ठेवीत नाही.

         शरद देवेकर

   शेती सेवा केंद्र, गारगोटी .