|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दलित वस्ती सुधार योजनेंतंर्गत मिळणारा निधी अन्यत्र खर्च का ?

दलित वस्ती सुधार योजनेंतंर्गत मिळणारा निधी अन्यत्र खर्च का ? 

वार्ताहर / यमगे

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळणारा निधी प्रत्यक्षात त्या वस्ती कामावर होत नाही. सोनाळी (ता.कागल) येथे दलित वस्ती फंडातून सोनाळी-कुरणी साकव मंजूर आहे पण प्रत्यक्षात तो दिसत नाही . त्याचा निधी सोनाळी-निढोरी धरणाच्या ओढयावर साकव बांधण्यासाठी खर्च केला जात आहे.ही योजना दलित वस्तीसाठी असताना काही राजकीय हेतुने व दबावाने हा प्रकार होत आहे.साकव निधीची पळवापळवी करू नये अन्यथा दलित समाज संघर्ष करेल असा इशाराही भारीप बहुजन महासंघाने निवेदनाद्वारे केलाआहे .

दलित वस्ती सुधार योजनांचा निधी पळवला जातोय,असा आरोप करून या निवेदनात म्हटले आहे कि दलित योजनांचा निधी प्रत्यक्षात 25 टक्के खर्च होतोय व इतर निधी अन्यत्र खर्च केला जात आहे.दलित वस्ती निधीसाठी ग्रामपंचायत ,नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद ठराव सर्वानुमते  मंजूर करतात . पण मिळालेला निधी अन्यत्र खर्च होतो.काही ठिकाणी हा निधी कागदोपत्रीच खर्च होतोय याची सखोल चौकशी झाली पाहिजे .

             सदरचे निवेदन भारीप महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासो कांबळे ,जिल्हा संघटक संतोष गायकवाड , संपर्क प्रमुख अनिल कांबळे, कृष्णात कांबळे ,सारिका कांबळे ,रोहिणी कांबळे, संघर्ष बहुजन सेनेचे राज्य संघटक संजय कांबळे, सौरभ कांबळे, गोदाबाई कांबळे, मरगू कांबळे, सोनम कांबळे, संदीप कांबळे,राणी कांबळे, इंदुबाई कांबळे आदी प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांनी संबधित विभागांना निवेदन दिले आहे .