|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गाळ उपशासाठी पालकमंत्र्यांकडून मदत

गाळ उपशासाठी पालकमंत्र्यांकडून मदत 

वार्ताहर / वेंगुर्ले:

निशान तलावातील गाळ काढण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्वरित पोकलॅन मशीन, दोन जे. सी. बी., तीन डंपर व दोन ट्रक्टर यांची सोय केली आहे. त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढविण्यासाठी अडीच फूट गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तलावातील गाळ काढण्याची मागणी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ व तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर यांनी केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार केसरकर यांनी तलावाची पाहणी करून गाळ काढण्यासाठी पोकलॅन मशीन, दोन जे. सी. बी., तीन डंपर व दोन ट्रक्टर मंगळवारी सायंकाळी उपलब्ध करून दिले.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या सामुग्रीतून निशान तलावातील सुमारे एक एकर क्षेत्रातील अडीच फूट खोलीचा गाळ काढण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, शहरप्रमुख विवेक आरोलकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, नगरसेविका सौ. सुमन निकम, माजी नगरसेवक अभिनय मांजरेकर, हेमंत मलबारी, अजित राऊळ, हनू गावडे, डेलीन डिसोजा, नीतेश कुडतरकर आदी उपस्थित होते.