|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजघराण्याला समाजमाध्यम व्यवस्थापकाची गरज

राजघराण्याला समाजमाध्यम व्यवस्थापकाची गरज 

ब्रिटनमधील प्रकार : 26 लाख रुपये वेतन मिळणार

वृत्तसंस्था/ लंडन

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना समाजमाध्यम व्यवस्थापकाची गरज आहे.  राजघराण्याकडून जॉब लिस्टिंग संकेतस्थळावर याकरता जाहिरात देण्यात आली आहे. ‘डिजिटल कम्युनिकेशन्स ऑफिसर’ला महाराणींसाठी काम करावे लागणार आहे. महाराणींची उपस्थिती सार्वजनिक तसेच जागतिक व्यासपीठांवर टिकवून देण्यासाठी व्यवस्थापकाला नवे मार्ग शोधावे लागतील असे संकेतस्थळाने म्हटले आहे.

नोकरीसाठी जाहिरात ‘थेअरीहाउसडोल्ड डॉट टाल डॉट नेट’वर देण्यात आली आहे. संकेतस्थळानुसार डिजिटल कम्युनिकेशन ऑफिसरला 30 हजार पौंड (सुमारे 26 लाख 58 हजार रुपये) वार्षिक वेतन मिळणार आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत आठवडय़ात 37.5 तास काम करावे लागणार आहे. वर्षाला 33 दिवस सुटी आणि दिवसाच्या वेळी मोफत जेवण मिळणार आहे. ही नोकरी बकिंगहॅम पॅलेससाठी असणार आहे.

समाजमाध्यमांचे व्यवस्थापन

अधिकाऱयाला डिजिटल आणि समाजमाध्यमावर येणाऱया वृत्तांचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. याचबरोबर काही डिजिटल प्रकल्पांवरही काम करावे लागेल. डिजिटल मीडिया तज्ञांच्या एका पथकासोबतही काम करावे लागणार असून समाजमाध्यम आणि डिजिटल व्यासपीठांसाठी लेख लिहावे लागतील. राजघराण्याशी संबंधित सर्व हालचालींवर नजर ठेवावी लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मे होती.

पात्रता

sपदवीसह संकेतस्थळ व्यवस्थापनाचा अनुभव

sसमाजमाध्यम व्यवस्थापनात प्रावीण्य

sडिजिटल, समाजमाध्यमांवर लिखाणाचा अनुभव

sमजकूर व्यवस्थापन यंत्रणेवर कामाचा अनुभव