|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चारा बँकेतून सहा टन चारा वितरण

चारा बँकेतून सहा टन चारा वितरण 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात पाणी समस्येबरोबर चारा टंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. चारा टंचाईतून पशूपालक संकटात सापडला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन निपाणी समाधीमठ कार्यस्थळी महसूल विभागाने गेल्या दोन दिवसांपासून चारा बँक सुरू केली आहे. यातून जनावरांसाठी कडबाकुट्टीचे वितरण करण्यात येत आहे. याला पशूपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात सहा टन चारा वितरण करण्यात आला आहे.

याविषयी बोलताना समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी म्हणाले, शासनाकडून महसूल विभागातर्फे चारा टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चारा बँकेच्या माध्यमातून जनावरांसाठी सकस अशा कडबाकुट्टीचे वितरण सुरू केले. चारा व पशूखाद्याचे भाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत नाममात्र अशा 2 रुपये प्रतिकिलो भावाने सुरू असलेले चारा वितरण लाभदायक ठरत आहे. ही महत्त्वपूर्ण योजना या पुढील काळात चारा उपलब्ध होईपर्यंत सुरूच ठेवावी, असे सांगितले.

ग्रामलेखाधिकारी सुनील पोळ म्हणाले, उपलब्ध केला जाणारा चारा चांगल्या दर्जाचा आहे. यामुळे माफक भाव व चांगला दर्जा यातून खरेदीसाठी पशूपालकांचा प्रतिसाद लाभत आहे. यापुढील काळात जसा चारा उपलब्ध होईल तसे वितरणही सुरूच राहील, असे सांगितले. यावेळी शेतकरी, पशूपालक, अधिकारी उपस्थित् धामणेची कन्या बनली महाराष्ट्राची मंत्रालयीन साहाय्यक

स्मिता बेळगुंदकर – पाटील यांचे यश

बेळगाव : 22डीआय6 – स्मिता  बेळगुंदकर

@ बेळगाव / प्रतिनिधी

नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून झालेल्या नेमणुकीमध्ये मूळच्या धामणे येथील असणाऱया स्मिता अनंतराव बेळगुंदकर (सध्या स्मिता रविंद्र पाटील) यांची महाराष्ट्र राज्यात 18 व्या क्रमांकाने निवड होऊन त्यांची मंत्रालयीन साहाय्यकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

 स्मिता यांचे शिक्षण शिनोळी खुर्द ता. चंदगड येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2015 साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कोल्हापूर येथील महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत केला. 2018 साली लग्नानंतर पुणे येथे अभ्यास सुरू केला. त्यांच्या आई निवृत्त प्राथमिक शिक्षिका असून वडील व्यावसायिक आहेत. त्यांचे पती पुणे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. कठोर मेहनतीमुळे त्यांनी हे यश मिळविले आहे. सीमाभागातील तरुणी शासकीय सेवेत दाखल झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.