|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » बेळगावपाठोपाठ चिकोडीतही भाजप

बेळगावपाठोपाठ चिकोडीतही भाजप 

बेळगाव

बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे सुरेश अंगडी हे अंदाजे 1 लाख 73 हजार मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी काँग्रेसचे डॉ. साधुण्णावर यांचा पराभव केला. या मतदार संघात 57 उमेदवारांनी अर्ज भरला होता. अंगडींना विजय अपेक्षीतच होता. जनतेने मोदींच्या नेतृत्वाकडे पाहून मतदान केले.

चिकोडीत काँग्रेसला झटका बसलाआहे. खासदार म्हणून लोकप्रियता कायम राखलेल्या प्रकाश हुक्केरी यांना याखेपेस मात्र भाजपच्या लाटेपुढे हार मानावी लागली आहे. भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांनी 1 लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: