|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेठीत स्मृतीच क्वीन

अमेठीत स्मृतीच क्वीन 

अमेठी

 उत्तर प्रदेशमधील अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी जिंकल्या आहेत. अंदाजे 30 हजार मताधिक्याने त्या विजयी झाल्याचे सांगण्यात येते. राहुल गांधी यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक ठरला आहे.

 रायबरेलीत ‘सोनिया’चा दिन

 काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली अंदाजे 2 लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवलाय. त्यांच्या विरोधात भाजपचे दिनेश सिंग पराभूत झाले. रायबरेलीत एक प्रकारे ‘सोनिया’चा दिनू साजरा केला जात आहे.