|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » झुंड कादंबरीला ‘तापी पूर्णा’ पुरस्कार

झुंड कादंबरीला ‘तापी पूर्णा’ पुरस्कार 

वार्ताहर/ करडवाडी

 पारदवाडी (ता.भुदरगड) येथील पण सध्या नोकरी निमित्य मठगाव येथे असणारे जंगल संशोधक दता मोरसे यांनी  गव्यांच्या वास्तव जीवनावर आधारित  झुंड  कादंबरीला जळगाव येथील उज्जैनकर फौडशन साहित्य प्रतिष्ठान चा तापी पुर्णा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. असल्याने पारदेवाडी  गावात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी त्यांच्या या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, तुकोबा माणदेशी पुरस्कार, करवीर नगर वाचन साहित्य मंडळ, डी डी आसगांवकर सांस्कृतिक ट्रस्ट, कविवर्य ए पां रेंदाळकर साहित्य पुरस्कार अशा विविध सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव करण्यात आला होते. दता मोरसे यांचे  सोळा वर्षे जंगलात गवा आणि अरण्य भाषा यावर त्याचे काम सुरु आहे.सध्या महाष्ट्रातील प्रसिद्ध युवा जंगल अभ्यास म्हणून त्यांचे नांव आदराने घेतले जाते.त्यांच्या घोलमोड व झुंड या कादंब्रया पर्यावरण वादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्ग संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे कार्य या कादंब्रयातून वाचकासमोर

आणल्याने त्यांचे कौतुक सर्व। स्तरावर होते आहे.