|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पुन्हा ‘भाजप’च

पुन्हा ‘भाजप’च 

गुजरात

देशाला पंतप्रधानपदाचा उमेदवार देणाऱया गुजरात राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आली आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली. लेकाच्या या भीम पराक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पदापासून  ते पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदींना भक्कम साथ देणाऱया गुजरातने यावेळीही 25 जागांवर विजय संपादन करत भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आहे. गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून प्रथमच लोकसभेची निवडणूक लढविणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नेत्रदीपक यश मिळवत विजय प्राप्त केला आहे. त्यांच्याविरोधात लढणाऱया काँग्रेसच्या डॉ.सीजे चावडा यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. गुजरातमधील वडोदरा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रंजनाबेन भट्ट यांनी 5 लाखापेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला आहे. राजकोट लोकसभा मतदारसंघातून कुंदरिया मोहनभाई यांना यश मिळाले आहे. त्यांची यंदाची लोकसभेसाठीची ही दुसरी टर्म आहे. बारडोली, वलसाड, नवसारी, सूरत लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीही भाजपच्या पारडय़ात भरघोस मतदान करत पक्षाला विजयश्री प्राप्त करून दिली आहे.