|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘कमळ’च फुलले…

‘कमळ’च फुलले… 

राजस्थान

गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थान पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागांवर भाजपने अबाधित वर्चस्व स्थापन केले होते. यंदा त्याच विजयाची पुनरावृत्ती राज्यात झाल्याची पहावयास मिळाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राजस्थानात जवळपास 3 टक्के अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती. राजस्थानामध्ये भाजपला 25 पैकी 23 जागांवर निर्विवाद यश मिळाले असून, मोदी फॅक्टर यावेळी चालल्याचे दिसून आले. विधानसभेत राज्यात सत्ता स्थापन करणाऱया काँग्रेसला मात्र लोकसभेत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. नागौर मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार डॉ. ज्योती मिर्धा यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे उमेदवार हनुमान बेनीवाल यांनी पराभव केला. जयपूर ग्रामीण मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विजय मिळविला. बीकानेरमधून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लक्षवेधी विजय प्राप्त करत दिमाखदार यश संपादन केले.