|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पूर्ण तंदुरूस्तीनंतरच दीपाचे पुनरागमन

पूर्ण तंदुरूस्तीनंतरच दीपाचे पुनरागमन 

वृत्तसंस्था/ कोलकाता

भारताची महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचे पूर्ण तंदुरूस्तीनंतरच जिम्नॅस्टीक क्षेत्रात पुनरागमन होईल असे प्रतिपादन तिचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले आहे. तंदुरूस्तीच्या समस्येमुळे 2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील तिच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त  करण्यात आली होती.

दीपा कर्माकर ही भारताची अव्वल महिला जिम्नॅस्ट म्हणून ओळखली जाते. तिला यापूर्वी गुडघा दुखापतीच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. या दुखापतीमुळे 13 ते 16 जून दरम्यान मंगोलियात होणाऱया आशियाई जिम्नॅस्टीक स्पर्धेतून तिला माघार घ्यावी लागली आहे. ही दुखापत लवकर बरी होईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक नंदी यांनी व्यक्त केला आहे. दीपाला पुन्हा काही वेळ सरावासाठी मार्गदर्शन चालू आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी ती पूर्ण तंदुरूस्त राहील, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकानी व्यक्त केला. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत दीपा कर्माकरचे पदक थोडक्यात हुकले होते. जर्मनीत 4 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान ऑलिंपिक पात्रतेसाठी होणाऱया विश्व़ जिम्नॅस्टीक स्पर्धेतील सहभागा विषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.