|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जोल्लेंच्या विजयात हुक्केरी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा

जोल्लेंच्या विजयात हुक्केरी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा 

प्रतिनिधी/ संकेश्वर

अत्यंत चुरशीने पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांचा दारुण पराभव केला. या विजयात हुक्केरी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असल्याची चर्चा निकालानंतर कार्यकर्त्यांत होती. जोल्ले विजयाचे वृत्त स्पष्ट होताच संकेश्वर व यमकनमर्डी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर होताच संकेश्वर येथील भाजप कार्यकर्त्यांनी नदी गल्लीत गुलालाची उधळण करीत मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मोदी मोदी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून स् भर ही केवोडला. भाजपच्या पारडय़ात अपेक्षेपेक्षा अधिक मतांची पडलेलीळ मोदींच्या नेतृत्त्वाला समर्थन करण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. यमकनमर्डी मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे करीत असतानाच त्यांच्याच मतदारसंघात भाजप उमेदवाराला वाढलेले मतदान चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र लोकसभेच्या लागलेल्या निकालाने भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांना जबर धक्का दिल्याची चर्चा सर्वत्र होती.