|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » बँकिंग क्षेत्रांच्या मजबुतीस खासगी गुंतवणूक आवश्यक

बँकिंग क्षेत्रांच्या मजबुतीस खासगी गुंतवणूक आवश्यक 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्या देशातील गुंतवणूक क्षेत्रांचा विचार केल्यास आजही खासगी क्षेत्रात होणाऱया गुंतवणुकीचा टक्का  कमी असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण करात होणारी कपात आणि हाऊस होल्डींगमधील बचत वाढविण्यासाठी या स्थितीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

वित्त वर्ष 2019मध्ये ग्रॉस फिक्सड कॅपिटल फॉर्मेशन(जीएफसीएफ)10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याला गुंतवणुकीचे संकेत मानले जाते. तर वित्त वर्ष 2018मध्ये 9.3 टक्क्यांनी वधारला होता. जो मागील 2014 ते 2016 या कालावधीत 3.6 टक्के राहिल्याचे नमूद करण्यात आले होते.

बँकिंग क्षेत्रात कर्जाची समस्या असून यावर उपाय काढण्यासाठी नियमितपणे प्रयत्न केले जातात. परंतु यासाठी इज ऑफ डूइंग बिजनेसचे व मेक इन इंडियाची पॉलिसी विविध क्षेत्रात मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ञ तुषार अरोडा यांनी सांगितले आहे.

 

बँकिंग क्षेत्राला चालना

बँकिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी व मजबूत बनविण्यासाठी कर्ज पुरवठा व एनबीएफसीमार्फत देण्यात येणारी रोख रक्कम यावर आळा घालण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी सरकारची प्राथमिक योजना उभारण्यासाठी आवश्यक योजना तयार करावयास हवी.