|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » अदाणीची कोळसा प्रकल्प मंजुरी?

अदाणीची कोळसा प्रकल्प मंजुरी? 

ऑस्टेलियातील खाणीचा प्रश्न : तीन सप्ताहानंतर निर्णयाची शक्यता

वृत्तसंस्था/ मेलबर्न

भारतातील दिग्गज कंपनी अदाणी समूहाचा व्यावसायिक कोळासा उत्पादनासाठी ऑस्टेलियातील उत्खननासाठीची अंतिम मंजुरी आणखीन तीन आठवडय़ाच्या काळात मिळणार आहे की नाही ते स्पष्ट होणार असल्यची माहिता ऑस्टेलियातील क्वीसलॅन्ड प्रातांतील एका नेत्याने दिली आहे.

सदरच्या योजनेला हिरवा झेंडा दाखविण्याचा असल्यास अदाणी ग्रुपला प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण मागील आठ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

ऑस्टेलियात प्रवेश 2010 मध्ये

अदाणी ग्रुपमधील मध्य क्वीसलॅन्डमधील व्यावसायिक कोळासा उत्खनन व खरेदी याकरीता 2010 साली कंपनीने ऑस्टेलियात प्रवेश केला होता. परंतु आगामी काळात हा प्रातं आणि या ठिकाणी होणारे कोळाशाचे उत्खनन यावर अनेकदा वादाची झालर लागली होती. कारण सदरची येजना राबवित असताना प्रकल्पातून जवळपास गुणवत्तापूर्ण असे 2.3 अब्ज टन कोळासा उत्पादनाचे ध्येय होते.

पर्यावरणाचा प्रश्न

ग्रेट बॅरियर रीफ वर्ल्ड हेरिटेज क्षेत्रावर दुष्परिणाम होण्याचे संकेत मिळण्याच्या भितीनेच या प्रस्तावाला मान्यता देण्यसाठी विलंब लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.