|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » ऍपलचे चालू वर्षात नवीन आयफोन सादर होणार

ऍपलचे चालू वर्षात नवीन आयफोन सादर होणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोन निर्मितीत अग्रेसर असणारी ऍपल कंपनी चालू वर्षात नवीन तीन आयफोनचे सादरीकरण करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आयफोन 11, आयफोन एक्सआर 2 व आयफोन 11 मॅक्स या मॉडेलचा यात समावेश असणार आहे. परंतु निश्चित आम्ही तीन  आयफोन सादर करणार असल्याची कंपनीकडून देण्यात आली आहे. यांना युरेशियन डेटाबेस मॉडेल नबर्स फाईल्स करण्यात आल्या आहेत.

नवीन आयफोनमध्ये तीन कॅमेऱयांची सुविधा

सादर होणाऱया आयफोनमध्ये ए21 नवीन आयफोन एक्सआर 2 मॉडेल नंबर असणाऱया आयफोनमध्ये तीन स्टेरेजचे ऑपशन्स मिळाले आहेत. त्यासोबतच दुसऱया मॉडेलना स्लो इंटेल मॉडेलची सोय असणार आहे. तय आयफोन 11 , आयफोन11 मॅक्ससाठी ए22 मॉडेल दिली जाणारआहेत यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तीन कॅमेऱयांची सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नवीन आवृत्तीचे सादरीकरण

या अगोदर ऍपलने 8 आणि 9 वी आवृत्ती असणारी इंटेल कोर सुविधा असणाऱया सिस्टीमची मॅकबुक प्रो लॅपटॉपची नवीन आवृत्ती बाजारात उतरली होती.या 15 इंच आकारच्या या मॅक बुक हे आताच्या कालावधीत सर्वात वेगवान लॅपटॉप मॉडेल असणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. तर 40 टक्क्यांनी अधिक गुणवत्ता असणारे मॉडेल महत्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी म्हटले आहे.