|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेचे ग्राहकांसाठी देशव्यापी परिषदेचे आयोजन

स्टेट बँकेचे ग्राहकांसाठी देशव्यापी परिषदेचे आयोजन 

मुंबई  :

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखण्यात येणाऱया स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या समस्या व नवीन सूचना या संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी येत्या 28 मे रोजी देशपातळीवर परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती शुक्रवारी बँकेकडून देण्यात आली आहे. यासाठी बँकेने आपल्या 17 स्थानिक विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत 500 पेक्षा अधिक ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँक या परिषदेच्या अंतर्गत एक लाखाहून अधिक ग्राहकांचा संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याचा उद्देश लोकांना संपर्क करत ग्राहकांचा विश्वास आणि मजबूत योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रबंधक संचालक पी.के गुप्ता यांनी यावेळी दिली.