|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » दुचाकी-तीनचाकी इलेक्ट्रिक वाहने 2023 पर्यंत रस्त्यावर धावणार

दुचाकी-तीनचाकी इलेक्ट्रिक वाहने 2023 पर्यंत रस्त्यावर धावणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात आगामी काळात आता खनिज तेल पेट्रोल डिझेलची दुचाकी व तीनचाकी वाहने बंद होणार असून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहने धावणार असून त्यांची सुरुवात मार्च 2023 रोजी होणार असून त्यासाठी सध्या नीती आयोगाने पुढाकार घेतला असल्याची माहिती नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी दिली आहे. सदरच्या योजनेमधून 150 सीसी क्षमतेची दुचाकी सन 31 मार्च 2023 ते मार्च 2025 पर्यत धावणार असल्याची योजना तयार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे मोठे केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.  मार्च 2025 नंतर नवीन दुचाकी व तीनचाकी वाहनांची विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये 150 सीसीच्या इलेक्ट्रिक वाहनांना वापरण्यात येणाऱया बॅटरीत लिथियम आणि आयर्नचा वापर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 2017-18 या कालावधीत देशात 56 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याची माहिती सोसायटी ऑफ द मन्युफॅक्चरिग ऑफ इलेक्ट्रिक वाहन यांच्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.