|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » मुंबई शेअर बाजारात तेजीची उसळी

मुंबई शेअर बाजारात तेजीची उसळी 

सेन्सेक्स 623 अंकानी मजबूत , निफ्टी 11844 च्या वरती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील अनेक दिवसांपासून मुंबई शेअर बाजारवर असणारा लोकसभा निवडणुकीचा दबाव अखेर गुरुवारी समाप्त झाला आहे. गुरुवारी सादर झालेल्या लोकसभेच्या अंतिम निकालात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. यात गुरुवारी बाजाराने सुरुवातीला 41 हजारचा टप्पा पार केला आणि अंतिम क्षणी नफा कमाईमुळे बाजारात 299 अंकाची घसरण नोंदवली.

तर याउलट शुक्रवारी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 623 अंकानी मजबूत होत 39,434.72चा टप्पा गाठल्याची नोंद करण्यात आली. भारतात आता स्थिर सरकार म्हणून दुसऱयांदा भाजप सरकार स्थापन करणार असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 187 अंकानी वधारत 11,844.10 अंकाच्यावरती पोहोचला.

निकालाचा प्रभाव बाजारावर

मागील अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार आपली गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात करण्याची याबद्दल अंदाज बांधून राहायचेत. परंतु सध्या लोकसभेची निवडणूक लागल्याने आणि 300 हून अधिक जागावर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे येणाऱया दिवसांमध्ये व्यापार क्षेत्राससह अन्य क्षेत्रातील गुंतवणूकदार आगामी काळासाठी स्थिर गुंतवणूक करण्यासाठीची योजना आखण्याचा अंदाज शेअर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

दिवसभरतील व्यवहारात आयसीआयसीआय बँकचे शेअर्स 5.09 टक्क्यांनी वधारले. तर लार्सन ऍण्ड टुब्रो, भारती एअरटेल, वेदान्ता आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स 4.60 टक्क्यांनी तेजीत राहिलेत. तर एनटीपीसी एचसीएल टेक, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या शेअर्सची घसरण झाली. कॅटिल गुड्स, दूरसंचार आणि ऑटो क्षेत्रात उत्साहाचे वातावरण राहिल्याने जवळपास 4.25 टक्क्यांची तेजी या क्षेत्रांतील शेअर्समध्ये नोंदवण्यात आली. येणाऱया दिवसात बाजार स्थिर राहण्याचे संकेतही अभ्यासकांनी मांडले आहेत..