|Sunday, August 18, 2019
You are here: Home » मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स शोरुमचा तिसरा वर्धापनदिन साजरा

मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स शोरुमचा तिसरा वर्धापनदिन साजरा 

बेळगाव / प्रतिनिधी

कॉलेज रोडवरील मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स शोरुमचा तिसरा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलतींचा वर्षाव करण्यात येत आहे.

दि. 22 मे ते 9 जून या कालावधीत बनणाऱया दागिन्यांचा घडणावळीवर सवलती दिल्या जाणार आहेत. सोने दागिन्यांच्या घडणावळीवर थेट 25 टक्के आणि हिरे दागिन्यांच्या घडणावळीवर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मलबार ही श्रंखला आता जगातील दहा देशांमध्ये 250 शोरुमच्या माध्यमातून ग्राहकसेवा देत आहे. त्यामुळे ग्राहकांची विश्वासार्हता सिद्ध झाली असल्याचे म्हणणे शोरुम संचालकांनी मांडले.