|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

   प्रतिनिधी / बेळगाव

शिप्पूर (ता. हुक्केरी) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. गुरुवारी पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संकेश्वर पोलीस स्थानकात या प्रकरणी भा.दं.वि. 363, 366(ए), 376, 328, 506 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले असून पिडीत 16 वषीय अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी संकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.